Saundatti Bhandara Oath : सौंदत्ती यल्लमा देवीच्या भंडाऱ्याची शपथ देऊन गोकुळ निवडणुकीत मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न? 'अंनिस' आक्रमक, थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Saundatti Bhandara Oath : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी सौंदत्ती येथे देवीच्या भंडाऱ्याची शपथ देऊन मतदारांवर दबाव आणला जाण्याचा संशय अंनिसने व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
Saundatti bhandara oath controversy

Saundatti bhandara oath controversy

esakal

Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत विशिष्ट उमेदवार किंवा पॅनेलच्या बाजूने मतदान करण्यासाठी मतदारांवर दबाव आणला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला (Gokul election controversy) आहे. सौंदत्ती येथील निकम कल्याण मंडपात १६ ऑक्टोबरला देवीच्या पवित्र भंडाऱ्याची शपथ देण्याचा कार्यक्रम नियोजित असल्याची माहिती मिळाल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com