Kolhapur Gokul milk union election latest news
esakal
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मतदार यादीबाबत (Gokul Dudh Sangh Election) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेवर राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दिले. यावरील पुढील सुनावणी २५ मार्चला ठेवली. परिणामी ‘गोकुळ’ची निवडणूक लांबण्याची शक्यता असून, ती पावसाळ्यानंतरच होईल.