Why is Gokul milk union election delayed?
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’कडील १९४ संस्थांना अवसायन काढण्याचा सहायक निबंधकांचा निर्णय नैसर्गिक न्यायतत्त्वाला धरून नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने तो रद्द (Mumbai High Court Circuit Bench) ठरविला. न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. त्यामुळे १९४ संस्थांसह इतर संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळण्यासाठीचा शक्यता वाढली आहे.