Kolhapur Gokul election result latest updates
esakal
कोल्हापूर : तीन मंत्री, डझनभर आमदार, आजी-माजी खासदारांसह सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत काल चुरशीने एकूण ९९.९६ टक्के मतदान (Gokul Milk Union election latest news) झाले. शपथा घेण्यापासून एक गठ्ठा मतदान घेऊन केंद्रावर येईपर्यंत दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी तालुक्यांच्या ठिकाणी शक्तिप्रदर्शन केले. आता मतमोजणीत कोण सरस ठरणार हे आज स्पष्ट होणार आहे.