Kolhapur gold market latest news
esakal
कोल्हापूर : काही महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना चांगला दिलासा मिळाला आहे. सोन्याचा भाव तोळ्यामागे तब्बल सहा हजार ३०० रुपयांनी व चांदीचा भाव एक किलोमागे ३४ हजार रुपयांनी उतरला (latest gold and silver prices in Kolhapur) आहे. यामुळे सराफ बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढणार आहे.