esakal
कोल्हापूर : ऐन लग्नसराई सुरू असताना सोने-चांदी दरात तेजी (Gold Prices in Kolhapur) सुरूच आहे. कोल्हापुरातील सराफ बाजारात रविवारी सोन्याचा प्रतितोळा दर एक लाख २९ हजार ६४० रुपये, तर चांदीचा प्रतिकिलो दर एक लाख ७५ हजार असा राहिला. एका दिवसात पाच ते सात हजार रुपयांनी दर वाढला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये सातत्याने दरवाढ झाली आहे.