
कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व खातेप्रमुखांसह कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. बहुतेक सर्वांनी बदल्या स्वीकारल्या असल्यातरी लाभदायक विभागाच्या एकाच अधिकाऱ्याने बदली टाळण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्याच मार्गावर पुढे जात अन्य तीन विभाग प्रमुखांनी बदलीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावर कहर असा की, बाजार समितीतील बदली थांबविण्यासाठी राजकीय नेते व मंत्र्यांच्या निरोपाचे वजन वापरले जात असल्याने बाजार समिती वर्तुळात आर्श्चय व्यक्त होत आहे.