
Kolhapur Bhakt Niwas Scam
esakal
Kolhapur School Misuse : पिराचीवाडी (ता. कागल) येथील महादेव मंदिर, हनुमान मंदिर, गहिनिनाथ मंदिर आणि गाव तलावात होऊ घातलेली शिवसृष्टी हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. गावात चांगले मंदिर, चांगले पर्यटनस्थळ व्हावे, त्याची प्रसिद्धी व्हावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा. त्यामुळे सुमारे १५०० ते २००० लोकसंख्या असणाऱ्या या गावासाठी लोकप्रतिनिधींकडूनही भरभरून निधी दिला जात आहे. ग्रामस्थांकडूनही मंदिरासह इतर सुधारणांसाठी वर्गणी दिली जात आहे; मात्र, शासनाचा येणारा निधी ज्या-त्या कामासाठी वापरला जातो का, यावर शंका उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकाराखाली घेतलेल्या माहितीमध्ये ठेकेदाराने शासकीय निधीचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती बांधकाम समितीच्या काही अधिकाऱ्यांकडून याची योग्य तपासणी केली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात मिळालेली कागदपत्रे आणि प्रत्यक्ष केलेल्या पाहणीची वृत्तमालिका आजपासून...