Chandrakant Patil and Hasan Mushrif Clash
esakal
कोल्हापूर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार कोण, यावरून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. एकीकडे शरद लाड यांना उमेदवारी मिळेल, असे संकेत मंत्री पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले, तर ‘ते निवडून येणार नाहीत,’ असे भाकीत मंत्री मुश्रीफ यांनी केले. ‘पदवीधर’च्या निवडणुकीला अद्याप वर्षभराचा अवकाश आहे. मात्र मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वादाची राजकीय वर्तुळात चांगलीत चर्चा रंगली आहे.