गुड न्यूज ! ऊस तोड मजूर निघाले आपल्या गावा; पण कसे?

kolhapur guardian minister satej patil Permission to sugarcane laborers go to town
kolhapur guardian minister satej patil Permission to sugarcane laborers go to town
Updated on

कोल्हापूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांना एसटी बसमधून त्यांच्या जिल्ह्यांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर जिल्ह्यातील 11 हजार 500 कामगार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत होते. या सर्वांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.


पुढिल दोन दिवसात हे सर्व कामगार आप आपल्या जिल्ह्यामध्ये पोहचतील, असा विश्वास पालकमंत्र्यांवी व्यक्त केला. याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, हे कामगार आपल्या मुळ गावी पोहोचल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी  होईल आणि तेथील प्रशासन त्यांची काळजी घेईल. त्याचबरोबर परराज्यातील 2 हजार 500 कामगारांची जिल्ह्यातील निवारागृहांमध्ये व्यवस्था केली आहे. त्यांना सोडण्याबाबत केंद्र शासनाच्या अजून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. ज्यावेळी सूचना येतील त्यावेळी त्याबाबत कार्यवाही केली जाईल. तोपर्यंत त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्याची भूमिका  प्रशासनाने घेतली आहे.


दहा एसटीमधून शरद कारखान्याचे 225 मजूर रवाना

जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखान्याचे 225 ऊस तोडणी मजूर दहा एसटी बसमधून सामाजिक अंतर ठेवत आपल्या गावी आज रवाना झाले आहेत. जवाहर सहकार साखर कारखाना, गुरुदत्त साखर कारखाना आणि दत्त सहकारी साखर कारखाना स्थळावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत वाहन तपासणी सुरु असून संध्याकाळपर्यंत या कारखान्याचे मजूरही आप-आपल्या गावी रवाना होतील. दोन दिवसात जिल्ह्यातील 11 हजार 500 मजूर आपल्या जिल्ह्यांकडे रवाना होतील, अशी माहिती साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी दिली.


जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या परवानगीने जिल्ह्यातील कामगारांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांकडे असणारे कामगार आज थोड्या थोड्या वेळाने रवाना होणार आहेत. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत ट्रक, ट्रॅक्टर या वाहनांची कागदपत्रे तसेच वाहनाची स्थिती याबाबत तपासणी सुरु आहे.

परराज्यातील कामगार वगळता राज्यातील इतर जिल्ह्यातील सर्व कामगारांना  त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचीही परवानगी घेण्यात आलेली आहे, अशी माहिती काकडे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why are tourists unhappy at Panhala Fort?
Kolhapur Nerli bullock cart race results
Tushar Prabhakar Patil death news
Kolhapur gold market latest news
Marathi News Esakal
www.esakal.com