Kolhapur : सुख-समृद्धीसह सर्वांगीण आरोग्यासाठी प्रार्थना

पारंपरिक उत्साहात गुढीपाडवा
Kolhapur
Kolhapur sakal
Updated on: 

कोल्हापूर : सुख-समृद्धीसह सर्वांगीण आरोग्यासाठीची प्रार्थना करत आज सर्वत्र पारंपरिक उत्साहात गुढीपाडवा साजरा झाला. घरोघरी गुढी उभारलीच. त्याशिवाय यानिमित्ताने विविध संकल्पही झाले. दरम्यान, उन्हाळ्यात आरोग्यदायी असणाऱ्या कडुनिंबाची चटणी प्रसाद म्हणून खाण्याची परंपराही जपली गेली. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली.

Kolhapur
Kolhapur News: महिलांसाठीच्या सवलत योजनेत राज्यात कोल्हापूर ‘नंबर वन’

पहाटेपासूनच गुढी उभारण्याची धांदल सुरू झाली. दारात सडा टाकून रांगोळी सजली आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीनेच गुढ्या उभारल्या गेल्या. त्यानंतर पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरू झाली. दुपारी सहकुटुंब सहभोजनावर भर दिला गेला आणि सायंकाळनंतर साऱ्यांचीच पावलं खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळली.

दरम्यान, अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीने महाद्वार कमानीसमोर भगवी गुढी उभारण्यात आली. विद्यापीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. धनंजय पठाडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, लालासाहेब गायकवाड,

उत्तम पाटील, सिटी फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव, मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे, उपाध्यक्ष माहेश्वरी सरनोबत, सचिव सुरेश पाटील, राजू गुप्ता, घनः श्याम पटेल, अनिल माने, धनंजय माळी आदी उपस्थित होते.

Kolhapur
Kolhapur News: महिलांसाठीच्या सवलत योजनेत राज्यात कोल्हापूर ‘नंबर वन’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Politics Chairman Election satej patil hasan mushrif
Kolhapur Gokul chairman election latest news
Gokul Chairman Election Satej Patil
Gokul election result 2026 in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com