Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
esakal
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष मिळून ३५०० ठराव असल्याचे जाहीरपणे सांगण्यात आले. या वक्तव्यामागचा उद्देश काय? यातून भारतीय जनता पक्षाची ताकद गौण असल्याचा संदेश दिला जात आहे का? या वक्तव्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, भाजपाला वेगळे गृहीत धरून काही स्वतंत्र राजकीय गणिते मांडली जात आहेत? तसे नसेल तर अशा आकड्यांचे राजकारण करण्यामागचे कारण जनतेसमोर स्पष्ट झाले पाहिजे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.