Swara Upadhye murder investigation latest update
esakal
हातकणंगले : माणगाव (ता. हातकणंगले) येथे नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रप्रभू मंदिरात आरती करून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात (Swara Upadhye case Hatkanangale) आला. शनिवारी रात्री उशिरा मंदिराशेजारील अरूंद गल्लीत ही घटना घडली. स्वरा नितीन उपाध्ये (वय १५) असे मृत मुलीचे नाव असून, ती इयत्ता नववीत शिकत होती. या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण लगम्मावर (वय ३७, रा. माणगाव) याच्यावर हातकणंगले पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.