Radhanagari dam water storage latest
esakal
कोल्हापूर : जिल्ह्यात माॅन्सूनचे आगमन जरी उशिरा झाले असले तरी कमी दिवसांत जास्त पाऊस हे पावसाचे बदललेले सूत्र या महिन्याभरातही असेल. १ जून ते ११ जुलै या ४१ दिवसांच्या काळात घाटमाथ्यावरील धरण क्षेत्रात ४१ वेळा अतिवृष्टी झाली (Kolhapur dam water level update today) आहे. पाटगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पाच वेळा अतिवृष्टी झाली, तर सर्फनाला पाणलोट क्षेत्रात ८ जुलैला ३४७ मिमी पावसाची नोंद झाली. आजपर्यंत धरण क्षेत्रात सरासरी ४०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.