esakal | कोल्हापुरात धुवांधार; 14 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेच्या पातळीत अडीच फुटांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

कोल्हापुरात धुवांधार; 14 बंधारे पाण्याखाली

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राजाराम बंधाऱ्यावरील (Rajaram Dam) पाण्याची पातळी चोवीस तासांत अडीच फुटांनी वाढली आहे. राधानगरी (RadhaNagari)धरणातून तेराशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू आहे. १४ बंधारे पाण्याखाली आहेत.शहरासह जिल्ह्यात आजही दमदार पाऊस झाला. शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हा अनलॉक झाल्यामुळे पावसातही ग्राहकांची गर्दी होती. पंचगंगा घाटाजवळील नदी पात्रांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९७.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.kolhapur heavy rains update 14 dams under underwater akb84

गगनबावड्यात दुपारनंतर जोर

असळज : गगनबावडा तालुक्यात आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. अणदूर-शेणवडे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत ११२ मिमी. पावसाची नोंद झाली. आजअखेर २०२६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. कुंभी धरण क्षेत्रात २१५ मिमी. पाऊस झाला असून धरणातून ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. कोदे धरणाच्या सांडव्यावरून ९३८ क्युसेक्स विसर्ग होत आहे.

चिकोत्रा परिसरात संततधार

पिंपळगाव :चिकोत्रा धरणक्षेत्रात आज दुपारनंतर पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चिकोत्रा पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आजअखेर ५७.७९% धरण भरले आहे. पिंपळगाव परिसरात चिखल कोळपणी सुरू आहे.

हेही वाचा: गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश; पाच अटकेत,राणीचा शोध सुरू

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली करूळ घाटाची पाहणी

गगनबावडा : करूळ घाटात खचलेल्या रस्त्याची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी आज सायंकाळी भर पावसात पाहणी करून घाट दुरुस्तीबाबत सूचना केल्या.

परिसरात मुसळधार पावसामुळे करूळ घाट व आता भुईबावडा घाटातील दरडी कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी भेट देऊन संबंधित विभागाला करूळ घाट दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याची सूचना दिल्या. तहसीलदार वैभव नाईक, पोलिस निरीक्षक जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.

loading image