Kolhapur heritage sites : कोल्हापूरचा हजारो वर्षांचा वारसा अतिक्रमणात हरवतोय; प्राचीन मंदिरांना फलकांच्या विळख्यातून मुक्ती कधी?
Encroachments Threaten Kolhapur's : शहराच्या मध्यवर्ती भागातील प्राचीन मंदिर-संकुले, ब्रिटिशकालीन वास्तू आणि टाऊन हॉल संग्रहालय पर्यटकांच्या दुर्लक्षित प्रवासाचा ‘अदृश्य’ भाग बनले
कोल्हापूर : महाद्वार रोडचे बिनखांबी गणेश मंदिर डिजिटल फलकांनी झाकले गेले. कपिलतीर्थ मंडईतील कपिलेश्वराचे मंदिर अतिक्रमणांनी वेढले आहे. मिरजकर तिकटीचे ११ व्या शतकातील विठ्ठल मंदिर शोधले तरच दिसेल, असे झाले आहे.