Ward-Wise Objection Count : इचलकरंजी महापालिकेच्या हरकतीमध्ये घेतलेल्या बहुतांशी तक्रारींची पडताळणी केली आहे. त्यानुसार स्थळ पाहणी करत दुरुस्तीची प्रक्रिया राबवली आहे. आता १० डिसेंबरला मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे, तर २२ डिसेंबररोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यावर अखेरच्या दिवशी तब्बल १७८ वैयक्तिक हरकती दाखल झाल्या, तर आतापर्यंत एकूण ५०४ हरकतींची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.