
-सुनील पाटील
कोल्हापूर : मौजे म्हाळसवडे (ता. शाहूवाडी) येथील गायरानमधील ‘सुबाभूळ’ तोडायला सांगितली होती, तर वनविभागाकडून जळाऊ लाकूड वाहतूक करण्याची परवानगी घेतली होती. अशावेळेला तोडलेल्या झाडांची अनधिकृत वाहतूक होणार नाही, याची मलकापूर वनक्षेत्रपालांनी दक्षता घेणे बंधनकारक होते. तसेच, परवानगी सुबाभूळ किंवा जळाऊ लाकडाची असताना इतर गटनंबरमधील झाडेही तोडली आहेत.