
-सुनील पाटील
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात १३ लाख २९ हजार घरकुले मंजूर केली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबाला १४ हजार ७०५ नवीन घरे मिळणार आहेत. यामध्ये सर्वाधिक लाभ शिरोळ, करवीर, कागल, हातकणंगले तालुक्याला होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे.