
कोल्हापूर : राज्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या निरक्षर कामगारांचे शिक्षण अखंडित सुरू रहावे. यासाठी कारखाना परिसरात त्यांच्यासाठी अध्ययन-अध्यापन वर्ग सुरू करावेत, असे आदेश साखर आयुक्त दीपक तावरे यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ९६ सहकारी व ९३ खासगी, अशा एकूण १८९ साखर कारखाना परिसरातील फडात ऊसतोडणी बरोबरच शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.