
कोल्हापूर : रंकाळा तलावात पुन्हा मोठ्या प्रमाणावर मासे मेले आहेत. ते पश्चिमेच्या काठाला तरंगत असून, चार दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. त्यातील काही मासे कुजले असून, दुर्गंधी येत आहे. तलाव पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांसाठीही असेही विदारक दृश्य पहायला मिळत आहे.