
कोल्हापूर : नागाळा पार्क परिसरात गस्तीवेळी मोटारीतून नेली जाणारी एक कोटी ९८ लाख ९९ हजारांची बेहिशोबी रोख रक्कम शाहूपुरी पोलिसांनी पकडली. किरण हणमंत पवार (देवापूर, ता. माण, सातारा) व अण्णा सुभाष खडतरे (रा. खडतरे गल्ली, सांगोला, सोलापूर) या दोघांकडे ही रक्कम मिळून आली.