India vs Pakistan Asia Cup Final
esakal
आशियाई कप अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला.
रिंकू सिंगच्या चौकारामुळे भारताने सामना जिंकला.
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकात तरुणाईने तिरंगा फडकवत जल्लोष केला.
कोल्हापूर : आशियाई कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय (India vs Pakistan Asia Cup Final) मिळविला. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी चौक तरुणाईने (Kolhapur Youth) गजबजला. तिरंगा फडकवत तरुणाईने भारताच्या विजयाचा जल्लोष केला. ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता.