

industrial gas supply stopped in Kolhapur collector order
esakal
हॉटेलचालकांना हे करावे लागणार
- चायनीय पदार्थ बंद करावे लागलीत.
- हॉटेलची वेळ कमी करावी लागेल.
- मर्यादित ग्राहकांनाच सेवा द्यावी लागेल.
- जास्त संख्येच्या ऑर्डर घेता येणार नाहीत.
Kolhapur Collector : आखाती देशाच्या युद्धाची झळ आता स्थानिक पातळीवर सामान्य माणसाला बसणे सुरू झाले आहे. गॅसपुरवठा खंडित झाल्याने जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा गॅसपुरवठा बंद करण्यात आला आहे. घरगुती गॅसपुरवठा मात्र सुरळीत आहे. नागरिकांनी घरगुती गॅसची चिंता करू नये. मागणी इतका पुरवठा नियमितपणे केला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे दिली.