Kolhapur Well Accident
esakal
पट्टणकोडोली (कोल्हापूर) : इंगळी (ता. हातकणंगले) येथे भूस्खलन झालेल्या सहा मोट विहिरीचे काम सुरू असताना पुन्हा अचानक मुरूम घसरल्याने पोकलँड मशीन थेट विहिरीत कोसळून (Kolhapur Well Accident) मोठी दुर्घटना घडली. या घटनेत विहिरीत पडून दोघेजण बुडाले. मात्र, नागरिकांच्या तत्परतेमुळे दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सिंता भारती (वय ३०) व आशिष शरमण (वय ३१) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर हुपरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.