

Cyber police investigate ₹44 lakh online investment fraud case involving WhatsApp trading scam.
sakal
उजळाईवाडी : आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने उद्योजकाची ४४ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. अॅक्सिस सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली संशयितांनी गंडा घातल्याची फिर्याद सत्यजित बाळासाहेव पाटील (वय ४८, आर. के. नगर सोसायटी नं. ३, मूळ रा. सोनाळी, ता. कागल) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांत दिली. पुढील तपासासाठी गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.