Almatti Dam च्या पाण्यामुळं कोल्हापूरला महापुराचा धोका? कृष्णा समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना साकडं

आलमट्टी, हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडावेत तसेच आलमट्टीतून विसर्ग वाढवावा, यासाठी समितीने पाठपुरावा केला.
Almatti Dam
Almatti Damesakal
Updated on: 
Summary

केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार आलमट्टी धरणाची पातळी ३१ जुलैपर्यंत ५१३ मीटर असावी, अशी अपेक्षा होती, मात्र अपेक्षित विसर्ग नव्हता.

कोल्हापूर : कोल्हापुरातील पुराचा (Flood in Kolhapur) धोका टाळण्यासाठी आलमट्टी धरणातून (Almatti Dam) विसर्ग वाढवावा, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार सतेज पाटील तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती.

तहसीलदारांना निवेदनही दिले होते. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला. याचा परिणाम म्हणून आलमट्टी धरणातून एक लाख २५ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू झाला. त्यामुळे कोल्हापुरातील महापुराचा धोका कमी होणार आहे, अशी माहिती महापूर नियंत्रण समितीने (Krishna Flood Control Committee) दिली.

Almatti Dam
Almatti Dam : कोल्हापूर, सांगलीला मोठा दिलासा! पूर टाळण्यासाठी 'आलमट्टी'तून वेळोवेळी सोडणार पाणी

केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार आलमट्टी धरणाची पातळी ३१ जुलैपर्यंत ५१३ मीटर असावी, अशी अपेक्षा होती, मात्र अपेक्षित विसर्ग नव्हता. याच वेळी कोल्हापूर, सांगली, सातारा धरण पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर कृष्णा, पंचगंगा, नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून फुग आली.

Almatti Dam
Ratnagiri Rain : रत्नागिरीत पावसाने उडवली दाणादाण! चिपळूण, खेड, राजापुरात पूरस्थिती; आजही Red Alert

या काळात आलमट्टी, हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडावेत तसेच आलमट्टीतून विसर्ग वाढवावा, यासाठी समितीने पाठपुरावा केला. त्यानंतर झालेल्या हालचालीनंतर आलमट्टी धरणातून दिवसात तीनवेळा विसर्ग वाढवला आहे. त्यानुसार एक लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कृष्णेचे पाणी, पंचगंगेचे पाणी वेगाने पुढे सरकते. त्यामुळे पुराची पाणी पातळी दोन दिवसांत कमी होईल, असा दावाही समितीने केला.

जुलैमध्ये आलमट्टीची पातळी ५१६ मीटरपेक्षा जास्त होती. वास्तविक पातळी ५१३ मीटर ठेवणे अपेक्षित होते. समितीच्या प्रतिनिधींनी पाटबंधारे विभागाकडे रोजची आकडेवारी मिळवून घेत आलमट्टीसह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील धरणाचा पाणीसाठा पातळी नोंद करून घेत वेळोवेळी विश्लेषण केले.

Almatti Dam
Kolhapur Rain : राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद; महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या पंचगंगेची काय स्थिती?

त्यानुसार अलमट्टीची पातळी जास्त असल्याने पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाण्याला फुग येत असून कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली हे लक्षात येताच अलमट्टीचा विसर्ग वाढविण्याची मागणी समितीचे सर्जेराव पाटील, धरणसाठा अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी केली होती.

Almatti Dam
Almatti Dam : 'आलमट्टी'तून फक्त 15 हजार क्युसेक विसर्ग; महाराष्ट्राला मोठा फटका, जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

2628 Cusecs Water Discharge From Radhanagari Dam
Supreme Court case on Almatti Dam height
Almatti Dam Flood Impact
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com