Kolhapur IT Park Project
esakal
कोल्हापूर आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे
शेंडा पार्क येथे ४२ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव
आयटी, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार
कोल्हापूर : कोल्हापुरातील बहुप्रतिक्षित आयटी पार्कचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री इंद्रनील नाईक आणि कृषिमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करून त्यांनी आयटी पार्कचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे.