
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळ व्यापाराला सुरुवात झाली...
esakal
Kolhapur Jaggery Deals News : कोल्हापूरच्या प्रसिद्ध गूळाचा हंगाम यंदा दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाला. मुहूर्ताच्या सौद्यात ४ हजार ५०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. मधुकर पाटील यांच्या अडत दुकानात हे सौदे निघाले. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व सभापती सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितित सौदे निघाले.