

Municipal Council Plans Shelter for Aggressive Dogs
sakal
जयसिंगपूर : भटक्या कुत्र्यांकडून दररोज दहा जणांना चावा घेतला जात आहे. महिन्याभरात पालिकेने ३३० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. ही प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे. नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून असलेला धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने ही मोहीम गतिमान करण्याची मागणी होत आहे.