

Kolhapur Political News : विधानसभा निवडणुकीत मतदारांची मर्जी सांभाळणाऱ्या नेत्यांना आता जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषद सदस्य होऊन समाजकार्य करणाऱ्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खर्चाची बाजू उचलणार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. ६८ मतदारसंघांचे आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत इच्छुकांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.