Kolhapur villagers boycott Jio petrol pump after elephant Mahadevi was moved to Vantara sanctuary : कोल्हापूरतील नांदणी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तिणीला वनतारा येथे नेण्यात आले आहे. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या हत्तिणीला नेल्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी हत्तिणीला परत आणण्याचा निश्चय केला आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गावकऱ्यांनी आधी जिओ सीमकार्डवर बहिष्कार टाकला. तर आता जिओच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.