Kolhapur Kabaddi Player Accident
Kolhapur Kabaddi Player Accidentesakal

Kolhapur Kabaddi Player Accident : कबड्डीपटूच्या अंगावरून थेट ट्रकचे चाक गेलं, पोलिस होण्याचे स्वप्न भंगल; ट्रेकींगला जाताना अपघात

Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाचीवाडी (ता. हातकणंगले) येथीर फाट्याजवळ पोलिस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या युवकाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला.
Published on

Kolhapur Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाचीवाडी (ता. हातकणंगले) येथीर फाट्याजवळ पोलिस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या युवकाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना आज पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुशांत सुरेश पोवार (वय २३, रा. किणी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. या अपघाताची नोंद कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com