. . . आणि त्याचे स्वप्न झाले साकार!

kolhapur kabnur onkar lambe c a exam pass
kolhapur kabnur onkar lambe c a exam pass

कबनूर (कोल्हापूर)-माध्यमिक शिक्षण घेताना वस्त्रनगरीतील सी.ए.म्हणजेच चार्टड अकाऊंटंट(सनदी लेखापाल) यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला की आपण सी.ए.व्हायचं हे त्याने माध्यमिक विद्यार्थी दशेतच ठरवलं आणि त्यादृष्टीने नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण अभ्यास केला. जिद्द,आत्मविश्वास व कठोर परिश्रमाने त्याने सी.ए.च्या अंतिम परीक्षेत दोन्ही ग्रुप एकाच वेळी घेऊन पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होवून ओंकार गुरुपद लंबे हा युवक यशाचा शिलेदार ठरला!
  

ओंकार हा मौजे वडगाव (ता.हातकणंगले) हे मूळ गाव असलेला वडिलांच्या नोकरीमुळे कबनूरला स्थायिक झाला. त्याचे वडील कबनूर हायस्कूलमध्ये शिक्षक व आध्यात्मिक वृत्तीचे असल्याने भजनी मंडळात सातत्याने सहभागी असतात.आई शिक्षिका व बहीण सुद्धा सी.ए.होण्याचे ध्येय बाळगून सी. ए.साठी आवश्यक असलेली सी.पी.टी. परीक्षा व आय.पी.सी.सी.परीक्षा उत्तीर्ण होऊन सी.ए.च्या अंतिम परीक्षेसाठी तयारी करीत असलेली. साहजिकच घरचे एकूणच वातावरण अभ्यासास पूरक व ध्येयवादी. त्यामुळे ओंकारला आपले ध्येय गाठण्यासाठी पूरक ठरले.

सी.ए. होण्याचे ध्येय असल्याने ओंकारने दहावी बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवल्यानंतर वाणिज्य ही विद्याशाखा निवडून बारावी बोर्ड परीक्षेत ८७ टक्के गुण मिळवले. नियोजनबद्ध अभ्यास व कठोर परिश्रम घेवून ओंकार सी.ए.साठी आवश्यक असणारी सी.पी.टी.परीक्षा व आय.पी.सी.सी. परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने तीन वर्षे आर्टिकलशिप बी.एस.ए.अँड असोशिएट्स चार्टड अकाऊंटंट या पुणे येथील नामांकित फर्ममध्ये यशस्वीरीत्या पूर्ण केली. तेथे त्याला सनदी लेखापाल (सी.ए.) सुनील भट्ट यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. कोरोनाच्या काळात ओंकारने सीए होण्याचे ध्येय समोर ठेवून अथक परिश्रम घेवून नियोजनबद्ध अभ्यास केला. त्यानंतर त्याने सी.ए.ची अंतिम परीक्षा दोन्ही ग्रुप घेऊन दिली आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन सी.ए.बनला!
  

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com