Kagal Peth Naka Highway latest update
esakal
शिरोली पुलाची (कोल्हापूर) : कागल ते पेठनाका या ६५ किलोमीटर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुमारे ५० ते ५५ टक्के काम पूर्ण झाले असले, तरी उर्वरित कामासाठी तब्बल १२०० कोटींचा सुधारित आराखडा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार (Kagal Peth Naka highway six laning latest updatec) केला. नव्या प्रस्तावाला मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.