esakal | सिद्धनेर्लीत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

सिद्धनेर्लीत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिद्धनेर्ली : येथे गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत तरुण मंडळे व कागल पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरपंच दत्तात्रय पाटील अध्यक्षस्थानी होते. सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील ४० तरुण मंडळांचे पदाधिकारी व गावातील प्रमुख नागरिक या बैठकीला उपस्थित होते. गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा न करता साध्या पद्धतीने साजरा करणे. त्यासाठी मंडप विद्युत रोषणाई न करणे, स्वागत व विसर्जन मिरवणूक , महाप्रसाद मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. असाही निर्णय घेण्यात आला.

सरपंच दत्तात्रय पाटील म्हणाले, कोरोना परिस्थिती आता जरी आटोक्यात आली असली तरी तज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी कोरोना प्रतीबंधक उपाययोजनांमध्ये गर्दी न करण्याचा समावेश आहे. विशेषता अशा सणासुदीच्या काळामध्ये एकत्रितरीत्या नागरिकांनी येऊन उत्सव साजरे करण्यास शासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. त्याची काटेकोरपणे पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे. या अनुषंगाने तरुण मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा.त्याऐवजी सामाजिक उपक्रम कोरोना संसर्ग कोरणा प्रतिबंधक नियमांचे पालन करून राबबावेत. त्यास ग्रामपंचायतीमार्फत सहकार्य करू.

हेही वाचा: मेघोली : 11 जनावरे गेली वाहून, 300 हेक्टर शेतीचं नुकसान

कागल पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी म्हणाले, सिद्धनेर्लीमध्ये अनेक उपक्रम राजकारण विरहितपणे यशस्वीपणे राबवण्याची परंपरा आहे.या परंपरेमध्ये गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून ग्रामस्थ व तरुणांनी भर घालावी. याचा आदर्श तालुक्यातील इतर गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळे घेतील. यावेळी उपसरपंच मनोहर लोहार, माजी सरपंच एम बी पाटील, वाय व्ही पाटील,विलास पोवार, प्रा सुनील मगदूम कृष्णात मेटील, शिवाजी मगदूम, दादासो पाटील विजय पाटील आदी उपस्थित होते.

-पंडित कोइंगडे

loading image
go to top