
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) परराज्यांतील उच्च दूध उत्पादन करणाऱ्या म्हशी खरेदीसाठी ‘धवलक्रांती’ योजना सुरू केली...
esakal
दृष्टिक्षेपात योजना...
कर्जफेड मुदत तीन ते पाच वर्षे. एका म्हशीसाठी दीड लाखाप्रमाणे दोन म्हशींसाठी
मिळणार तीन लाख कर्ज. फक्त घरठाण उताऱ्यावर मिळणार अर्थ पुरवठा.
बँकेकडून लाभार्थ्यास दिले जाणार रु. १० हजार अनुदान
Dhawalkranti Scheme KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेने परराज्यांतील दुधाळ म्हशींच्या खरेदीकरता धवलक्रांती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजुरांनाही आर्थिक भांडवल मिळणार आहे. विशेष म्हणजे निव्वळ दूध संस्थांच्या आणि दूध संघाच्या हमीवर हा अर्थ पुरवठा होणार आहे. याबाबतचा निर्णय बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. निव्वळ घरठाण उताऱ्यावर हे कर्ज उपलब्ध होणार आहे.