कोल्हापूर : कोकणी हापूसला मद्रास हापूसचा पर्याय

कोकणात यंदा हवामानाची साथ चांगली मिळाल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनात चांगली वाढ
hapus mango
hapus mangosakal

कोल्हापूर: कोकणात यंदा हवामानाची साथ चांगली मिळाल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. कोल्हापूरच्या बाजारात कोकणी हापूसचे आगमन जेमतेम होत आहे. त्याचे भाव उंची आहेत. अशात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या भावातील दाक्षिणात्य हापूस म्हणजे मद्रास हापूस आंब्याचे आगमन यंदा एक महिना अगोदरच झाले आहे. त्यामुळे एका वेळी कोकणी हापूस व दाक्षिणात्य हापूस आंब्यांची खव्वयांना चव चाखता येणार आहे.

येथील शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत दरवर्षी आंब्याची घाऊक आवक होते. त्याचे सौदे होतात. येथून आंब्याचा माल ग्रामीण भागात तसेच मराठवाड्याकडेही पाठवला जातो. यात कोकणी हापूस आंब्याला मोठी मागणी असते. त्यानुसार यंदाही देवगड, सावंतवाडी, मालवन, लांजा, रत्नागिरी या भागातून हापूस आंब्याची आवक होऊ लागली आहे. मात्र अद्याप जेमतेम एक हजार बॉक्स २००-३०० पेट्यांपर्यंत इतका जेमतेम माल येत आहे. वास्तविक, कोकणात हापूस आंबा काढणीला आला आहे. कांही आंबा पाडाला आला आहे. काढणी झाल्यानंतर पिकलेल्या आंब्याच्या पेट्या तातडीने मुंबईला पाठविण्याला बागायतदार प्राधान्य देत आहेत. कोकणी हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल.

त्यानुसार गुणत्तापूर्ण आंब्याला मुंबई बाजारपेठेत तसेच परदेशी बाजारात चांगला भाव मिळत असल्याने तसेच कोकणातून मुंबईला जाण्यास महामार्गा असल्याने बहुतांशीजन मुंबईला आंबा पाठवत आहेत. त्यामुळे कोल्हापूरला माल कमी येतो आहे. माल कमी आणि मागणी जास्त असल्याने कोकणी हापूस आंब्याचे भाव तूर्त चढेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना एकदा पेटी खरेदी करतात. जास्त पेटी खरेदी करताना खर्च वाढतो.

फळविक्रेते अमिन बागवान म्हणाले, की थोड्या फारफरकाने दरवर्षी असा विषय होतो यावर पर्याय म्हणून मार्केट यार्डातील काही फळ विक्रेत्यांकडे दक्षिणाती हापूस आंबा येतो. यंदाही मद्रास हापूस, कारवार हापूस, लालबाग, पायरी अशा कनार्टकी, केरळ व मद्रासकडून आंब्याची आवक होते. यापैकी मद्रास हापूस सध्या रोज २०० ते ५०० बॉक्स व ५० पेट्या मालाची आवक होत आहे. हा आंबा कोकणी आंब्याच्या भावाच्या तुलनेत सध्या ४० टक्के स्वस्त आहे. आवक वाढल्यानंतर कोकणी हापूस आंब्याच्या भावाच्या तुलनेत तो निम्म्या भावातही मिळतो. आणखी दहा दिवसात दोन्ही आंब्याची आवक वाढेल.’’

ज्यांना अस्सल आंबा खायचा आहे असे ग्राहक कोकणी हापूस आंबा खरेदीला जरूर प्राधान्य देतात. मात्र त्यासोबत कुटुंब मोठे असेल, खाणारे जास्त असतील तर कमी किंमतीत वेगळी चव म्हणून दक्षिणात्य आंब्यांची खरेदी तितक्याचे हौसेने केली जाते. त्यामुळे दक्षिणात्य आंब्याची कोल्हापूरात हापूसाला पर्यायी म्हणून पसंती दिली जात आहे. दक्षिणात्य आंब्याला ही मागणी वाढली आहे, असेही बागवान यांनी सांगितले.

कोल्हापुरातील घाऊक भाव असे

  • एक डझन बॉक्स आंब्याचे दर

  • कोकणी हापूस आंबा १०० ते १००० रुपये, पेटी १५०० ते ४५००

  • मद्रास हापूस आंबा २०० ते ५५० रुपये, पेटी १५०० ते ३०००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com