कोल्हापूर : ‘केएसए’तर्फे फुटबॉल हंगामाच्या तयारीला सुरुवात

३२० खेळाडूंची १६ संघातून नोंदणी; गडहिंग्लजचे खेळाडू ‘हॉट फेव्हरेट’
फुटबॉल
फुटबॉल sakal

कोल्हापूर : दोन वर्षांनंतर आशेचे संकेत दिसलेल्या फुटबॉल खेळाडूंनी मातृसंस्था असणाऱ्या कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनकडे नोंदणी केली. कोरोनाची लाट आणि प्रशासनाचे निर्बंध लक्षात घेऊनच हंगाम होणार असला, तरीही गडहिंग्लजच्या खेळाडूंनी या नोंदणीत ‘भाव’ खाल्ला. जिल्हांतर्गत खेळाडू या नोंदणीची अट ठेवल्याने शहराबाहेर एकमेव ठिकाण असणारे गडहिंग्लज हॉट फेव्हरेट ठरले आहे.

फुटबॉल
राज्याचा थकला 29 हजार कोटींचा जीएसटी परतावा !

के.एस.ए.तर्फे यंदाचा फुटबॉल हंगाम खेळण्याच्या तयारीला सुरवात झाली आहे. पहिल्यांदा संघ नोंदणी आणि आता प्रत्येक संघासाठी खेळाडू नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यात १६ संघांची नोंदणी झाली असून, प्रत्येक संघामध्ये २० या पद्धतीने एकूण ३२० खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

२०१९ मध्ये कोरोनामुळे जिल्ह्याच्या फुटबॉल हंगामाला ब्रेक लागला. अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेल्या फुटबॉलला यंदाच्या वर्षी काही आशेची किरणे दिसू लागली. येथील फुटबॉल बंद असल्याने परराज्यात जाऊन येथल्या संघांनी साजेशी कामगिरी केली. शेवटी के.एस.ए.ने यंदाचा हंगाम कोरडा न जाऊ देण्याचा निर्णय घेत नोंदणीने सुरवात केली आहे. यानंतर के.एस.ए.लीग स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या विविध फुटबॉल स्पर्धेमध्ये गडहिंग्लज येथील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला आहे. त्यातच मिळेल त्या मैदानावर आणि अपुऱ्या सुविधांमध्येही आपल्या खेळाचा स्तर उंचावला आहे. जिल्ह्यात फक्त कोल्हापूर सोडून गडहिंग्लज येथेच फुटबॉल खेळाला जातो. गडहिंग्लजने फुटबॉल टिकवल्याचे फळही येथील खेळाडूंना मिळत आहे. प्रत्येक संघाने गडहिंग्लजचा खेळाडू आपल्या संघात असावा यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करून या खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. यामुळे गडहिंग्लजच्या खेळाडूंचा भाव वधारला असल्याचे या नोंदणीनंतर झालेल्या संघबांधणीतून दिसून आले.

फुटबॉल
अजितदादांचे मोदी सरकारला पत्र! केंद्राकडे थकला 28 हजार कोटींचा 'जीएसटी'

नोंदणी झालेले संघ

  • श्री शिवाजी तरुण मंडळ

  • पाटाकडील तालीम

  • मंडळ- अ

  • बी.जी.एम. स्पोर्टस्‌

  • बालगोपाल तालीम मंडळ

  • दिलबहार तालीम मंडळ

  • खंडोबा तालीम मंडळ- अ

  • सम्राटनगर स्पोर्टस्‌

  • फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ

  • ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ

  • झुंजार क्लब

  • पाटाकडील तालीम मंडळ- ब

  • खंडोबा तालीम मंडळ- ब

  • कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ

  • प्रॅक्टिस फुटबॉल क्लब- अ

  • उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम

  • संयुक्त जुना बुधवार पेठ

''संघ आणि खेळाडू नोंदणीचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून, मैदानही सज्ज आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यावर लगेच हंगामाला सुरुवात केली जाईल.''

-प्रा. अमर सासणे, फुटबॉल सचिव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com