esakal | कोल्हापूर : बिबट्याचा 'फॅन्ड्री'ला पळवण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

कोल्हापूर : बिबट्याचा 'फॅन्ड्री'ला पळवण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
आनंद जगताप

कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे २३ ऑगष्ट रोजी पन्हाळगडावरील डॉ राज होळकर यांच्या राजाची झोपडी या त्यांच्या बंगल्यातून बिंबि नामक कुत्रीला पळवलेला बिबट्या काल पहाटे पुन्हा राजाच्या झोपडीत आला आणि त्याने फॅन्ड्री नावाच्या कुत्रीला पळवण्याचा प्रयत्न केला,पण त्याचा हा प्रयत्न डॉक्टरांच्या जागरूकतेपणामुळे फसला.

त्याचे असे झाले, डॉ होळकर यांचा बंगला गावाच्या बाहेर तटबंदीला लागून आहे.त्यांच्या निवासस्थानाशेजारी वनखात्याचे तबक वन उद्यान आणि त्याखाली जंगल असल्याने या जंगलातून बिबट्या, रानडुकरे,साळींदर,असे प्राणी नेहमी त्यांच्या परिसरात येतात.डॉक्टर दांपत्याला पाळीव प्राणी बाळगण्याचा शौक असल्याने त्यांच्या परिसरात १० ते १२ कुत्री आणि ४ ते पाच मांजरे बागडत असतात.

हेही वाचा: 'मंदिरं बंद आहेत, मग देव कुठे आहे?, तर देव...'

या प्राण्यांच्या वासाने शेजारच्या जंगलातील बिबट्या त्यांच्या परिसरात नेहमी येतो.१५ दिवसांपूर्वी बिबट्याने दबकत येवून त्यांची बिंबी नामक कुत्री पळवली होती, त्यावेळेपासून त्यांनी कुत्र्याची लहान पिल्ले हॉलमध्ये रात्री कोंडून ठेवण्यास सुरुवात केली,पण मोठी कुत्री संरक्षणासाठी व्हरांड्यात ठेवण्याची सोय केली,काल पहाटे बिबट्या कुत्र्याच्या वासाने त्यांच्या परिसरात आला.त्यांची फॅन्ड्री नावाची कुत्री व्हरांड्यातील बाकावर झोपली होती. बिबट्या दबकत दबकत चाहूल घेत, इकडे तिकडे बघत हळूच व्हरांड्याच्या गेटजवळ आला, पण गेट बंद होते. त्याने बाजूने वाट आहे का ते पाहिले, पण आत यायला दुसरा मार्ग नसल्याने तो गेटच्या फटीजवळ आला, पण धोका ओळखून तो तिथेच थांबला याच दरम्यान फॅन्ड्री ला जाग आली आणि ती जीवाच्या आकांताने भुंकू लागली.

आवाजाने डॉ.होळकर यांना जाग आली आणि त्यांनी बाहेरील वीजेचे दिवे लावून दार उघडले. उजेड पाहताच आणि माणसाची चाहूल लागताच बिबट्याने माघार घेत अंधारात गायब होणे पसंत केले. हा सर्व प्रकार त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला आहे. डॉक्टर वेळीच उठले नसते तर त्यांचे हे २५ वे कुत्रे बिबट्याने पळवले असते.

loading image
go to top