

kolhapur Goa-Made Liquor Bottles Worth ₹1.25 Crore Seized
esakal
Kolhapur English Liquor Seizure News : अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथे राजापूर- मलकापूर मार्गावर गोवा बनावटीचे विदेशी मद्य बेकायदेशीररीत्या घेऊन जाणाऱ्या ट्रक (एमएच-२०-ईजी-१३१०) वर कारवाई करत तो ताब्यात घेण्यात आला. त्यातील एक कोटी ३० लाख ५० हजार रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा, वाहन व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संशयित रामजीवन विरधाराम बिश्नोई (वय २६, रा. बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथक क्रमांक -१ ने ही कारवाई केली.