
Live In Relationship Kolhapur : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून झालेल्या वादानंतर समीक्षा ऊर्फ सानिका नरसिंगे (वय २३, रा. कसबा बावडा) हिचा खून करून पसार झालेला सतीश यादव (रा. उंड्री, ता. पन्हाळा, सध्या रा. शिवाजी पेठ) अद्याप मिळालेला नाही. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सानिकाला चाकूने भोसकल्यानंतर त्याने पलायन केले होते. गांधीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू आहे.
पाच वेगवेगळ्या पथकांकडून त्याच्या मूळ गावी, शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर येथील खोलीसह मित्रांकडेही छापे टाकण्यात आले. मात्र, तो मिळालेला नाही. खुनातील चाकू आज पोलिसांकडून जप्त करण्यात आला.