
-ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर: मिरवणुकांत ध्वनी यंत्रणेचा आवाज कर्णकर्कश असतो. त्याचा परिणाम केवळ सजिवांवर होतो, असे नाही, तर इमारतींवरही होतो. या कर्णकर्कश आवाजामुळे त्या परिसरात अनुनाद परिणाम (रेझोनन्स इफेक्ट) तयार होतो. परिणामी, घरांच्या काचा फुटतात. भिंतींना तडे जातात. मिरवणूक मार्गावरील धोकादायक आणि जीर्ण इमारती पडण्याची शक्यता असते. हा धोका लक्षात घेऊन पोलिस, प्रशासनाने गणेश मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक आहे.