

Maratha community member in Kolhapur donated land worth crores to the Jain community
esakal
Land Donation Jain Community Kolhapur : (विवेक दिंडे) : सध्या समाजात वाढत्या तणावाच्या चर्चांदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावमध्ये मात्र बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. महावीर जयंतीच्या निमित्ताने मराठा समाजातील विष्णू शामराव पाटील यांनी दिगंबर जैन समाजाला सुमारे साडेदहा गुंठे अगदी मोक्याची जमीन बक्षीसपत्राद्वारे देत समाजातील ऐक्याची परंपरा अधिक दृढ केली आहे. सध्या या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात असून या निर्णयाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.