

Kolhapur Major Accident
esakal
Kolhapur Accident News : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील चिखली फाट्याजवळ आज रात्री नऊ वाजता दुचाकी आणि एसटीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दिग्विजय दिलीप पाटील (वय ३९, रा. उरुण ईश्वरपूर) याचा जागीच मृत्यू झाला. तर अर्णव संतोष कंबुरे (१७, रा. ईश्वरपूर) आणि अंजली श्रीकांत वडगावकर (२०, रा. शाहूपुरी) हे दोघे गंभीर जखमी झाले. यातील अर्णव हा अत्यवस्थ आहे.