
कोल्हापूर: काँग्रेसचे नेते आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा एक पोस्टर सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दसरा चौकात लावलेल्या या फलकावर मालोजीराजे यांचा फोटो नुकतेच शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलेल्या शरंगधर देशमुख यांच्यासोबत झळकला आहे. उद्या मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस असल्याने या फलकाने केवळ लक्ष वेधून घेतले नाही, तर यातून भविष्यातील राजकीय बदलाचे संकेत मिळत असल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात सुरू झाली आहे.