Shahu Maharaj
esakal
कोल्हापुरात शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे स्पष्ट वक्तव्य केले.
अ. भा. मराठा महासंघाच्या मेळाव्यात राजेंद्र कोंढरे यांनी ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असे सांगितले.
राज्यस्तरीय मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजाने एकत्रित लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.
कोल्हापूर : ‘मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) गरज असून, ते मिळालेच पाहिजे. ते कसे देणार, हे सरकारने सांगावे’, असे आवाहन खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी रविवारी येथे केले. दरम्यान, आरक्षण देणाऱ्या मराठा समाजावरच आरक्षण मागण्याची वेळ आली आहे, नवीन गॅझेटनुसार ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही हे समजून घ्यावे’, असे प्रतिपादन अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले.