Kolhapur Vendor Tax Concerns : ग्रामीण आठवड्याबाजारांतील कर वसुलीवर संशय; समितीचे तीन कर्मचारी प्रत्यक्ष नियंत्रणात असूनही गैरव्यवहार
Rural Markets Face Revenue : फिरते पथक, समितीचे तीन कर्मचारी व ग्रामीण आठवड्याबाजारांतील विक्रेत्यांवर लक्ष ठेवतात; तरीही काही ठिकाणी बनावट पावती व चुकीच्या रकमेची वसुली होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : भाजीपाल्यासह विविध साहित्यांची विक्री करणारे विक्रेते रस्त्याकडेला, मंडई परिसरात किंवा बाजारात बसतात. त्यांच्याकडून बाजार समिती, महापालिका, नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत रस्ते कर/बाजार कर आकारते.