

Leaders discussing the mayoral power-sharing formula in Kolhapur civic politics.
sakal
कोल्हापूर : मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्यासाठी महायुतीत सव्वा वर्षाचा महापौरपदाचा फॉर्म्युला पुढे आला आहे. त्यातून भाजपला दोन, तर शिवसेनेला दोनदा संधी मिळणार आहे. ज्यांचा महापौर असेल, त्यांच्याकडे स्थायी समिती सभापतिपद, तर उपमहापौरपद मित्रपक्षाकडे देण्यात येणार आहे. त्यावर प्राथमिक चर्चा झाली असून, महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून यावर निर्णय घेणार आहेत.