कोरोनानं घेतला भावाचा बळी; म्हसवेच्या अक्षयनं थाटला विधवा वहिनीशी संसार I Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कोरोनानं घेतला भावाचा बळी; म्हसवेच्या अक्षयनं थाटला विधवा वहिनीशी संसार

कोनवडे : पतीच्या निधनानंतर महिलांना विधवा म्हणून उर्वरित आयुष्य जगताना अनेकदा कुटुंब आणि समाज व्यवस्थेकडून मर्यादा येतात. अशा महिलांना बऱ्याचवेळा कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमांना, सण समारभांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र या सगळ्याला झुगारुन देते म्हसवे (ता. भुदरगड) येथील अक्षय मोरे या अविवाहित तरूणाने आपल्या मोठ्या भावाच्या पत्नी म्हणजे भावजयसह विवाह केला आहे. आपल्या भावाचा आकस्मित मृत्यू झाल्याने पोरक्या झालेल्या बाळासह भावजयला पत्नी म्हणून स्विकारले आहे. विधवा भावजयीशी विवाह करून अक्षयने समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. परिसरात त्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

हेही वाचा: क्रांती रेडकरच्या ट्विटमध्ये मलिकांचा उपहास; शुभेच्छा दिल्या अन् म्हणाल्या...

म्हसवे येथील राहणारे मोतेश मोरे यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी स्वाती माने हिच्याशी झाला होता. दोघांचा सुखाचा संसार चालू होता. त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. या सुखी कुटुंबातील मोतेश आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु झाले. यातच मोतेशचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मोतेश यांच्या मृत्यूने मोरे व माने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मोतेशच्या म्रुत्युनंतर मोरे व माने कुटुंबीयांनी एकत्र बसून तरुणपणीच वैधव्य आलेल्या स्वातीच्या उर्वरित आयुष्याचा विचार करत असताना मोतेशचा लहान भाऊ अक्षय या अविवाहित तरूणाने आपण स्वातीसह तिच्या बाळाला स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले. हा अनोखा मंगल विवाह सोहळा रांगोळी (ता. हातकणंगले) येथे दोन्ही कुटुंबियांच्या व मित्र मंडळीच्या उपस्थित व बिद्री साखर कारखानाचे संचालक मधुकर देसाई व सरपंच सर्जेराव देसाई, पोलिस पाटील परशराम मोरे, बाजीराव देसाई, आनंद देसाई, गणपती देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विधवांचा सार्वत्रिक सन्मानाच्या दिशेने असणारा अक्षय व स्वाती यांचा हा पुर्नविवाह समाजासमोर आदर्श असा पुर्नविवाह ठरला आहे.

हेही वाचा: वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक; नवाब मलिक राजीनामा देणार का?

Web Title: Kolhapur Mhasave Youth Akshay Marriage With Swati His Sister In Law

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurbrother
go to top